बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | आपल्या बोलण्याच्या खास शैलीमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या आणि ‘बिग बॉस’ फेम विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांंच्या निवासस्थानी जाऊन विकास पाठकने भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठकने या भेटीबाबत माहिती देताना त्याच्या अंदाजात राज ठाकरेंचं कौतुक केलं. बाळासाहेबांनंतर अगर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे. आपल्याला अशी माणसं आवडतात, असं विकास पाठक म्हणाला.

विकास पाठक आणि राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. त्यासोबतच राज आणि हिंदुस्थानी भाऊच्या भेटींचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध होता. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतात. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. मात्र आता इंन्स्टाग्राम आणि फेसबुकचं खातं बॅन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

आश्चर्य! कोरोना लसीमुळे 9 वर्षानंतर 70 वर्षीय आजीची डोळ्यांची दृष्टी आली परत

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More