बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील आक्रमक भूमिकेमुळे सध्या राज्यात गदारोळ पहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी 4 मे चा अल्टिमेटम दिला होता त्यानुसार आजपासून मनसैनिक आंदोलन करताना दिसत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही, असं ट्विट करत संजय राऊत यांनी मनसेवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते. असे म्हणत राऊत यांनी याचे खापर राज ठाकरे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भोंग्यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यामध्ये खंड पडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, भोंग्यावरुन राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थो़डक्यात बातम्या – 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला नवं वळण, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

रशियाची जपानवर मोठी कारवाई, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी….”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

“भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला”

“मला दंगल भडकवायची असती तर….”; राज ठाकरे स्पष्टच बोलले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More