मुंबई | हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज सकाळी 7 च्या सुमारास तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्वीट करत थोरातांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत सुन्न करणारी आहे. तिच्या जाण्याने हिंगणघाटातील दारोडा गावावर शोककळा पसरली आहे. पीडितेवर आरोपीने पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली होती.
दरम्यान, पीडितेसाठी राज्यभरातून प्रार्थना केल्या जात होत्या. गेली 7 दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी, अशी मागणी राज्यभरात होत असून यासाठी राज्य सरकार पाऊलं उचलतील.
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 10, 2020
ट्रेंडिंंग बातम्या-
या सदस्याच्या निधनानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा
ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक
ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
Comments are closed.