बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! हिंगणघाट प्रकरणात आणखी दोन जणांचा सहभाग?

नागपूर | हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्ष अखेर थांबला असून शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते.

हिंगणघाट प्रकरणातील आरोपी विकी नगराळेला आणखी दोघांनी मदत केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संबंधित दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी दारोडातील ग्रामस्थांनी केली आहे.

पीडितेच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच याबाबत राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘तुला लाज नाही का वाटत…?’; महिला अत्याचाराविरोधात सुप्रिया सुळेंचं अभियान

सरकार पीडितेला जलद न्याय मिळवून देईल- छगन भुजबळ

महत्वाच्या बातम्या- 

धक्कादायक! मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई, वडील आणि भावाची आत्महत्या

शालिनी ठाकरेंचं हिंगणघाटच्या पीडितेला उपरोधिक पत्र; म्हणतात…

लेखी आश्वासनानंतर हिंगणघाटमधील पीडितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More