Top News महाराष्ट्र मुंबई

फडणवीसांच्या #हिंमतअसेलतर आव्हानाची सोशल मीडियात उडवली जातेय खिल्ली

Loading...

मुंबई | आज, आत्ता महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका लावून दाखवा, असं प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, फडणवीसांच्या #हिंमतअसेलतर या आव्हानाची सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

हिंमत असेल तर म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतलं आहे. ‘हिंमत असेल तर पहाटे अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घेऊन दाखवा’, ‘हिंमत असेल तर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेते बनवून तर दाखवा’, असं म्हणत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

फडणवीसांनी हिंमत असेल तर मोदींना फेकाफेकीत हरवू दाखवा, असं म्हणत एका नेटकऱ्याने फडणवीसांना टोला लगावला आहे, तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजितदादांना पाडून दाखवा, असं आव्हानं एकानं देऊन टाकलं आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या हिंमत असेल तर या वक्तव्यावरुन नेटकरी चांगलेच सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहेत. #हिंमतअसेलतर हा हॅशटॅग वापरुन अनेकांना त्यांना ट्रोल केलं आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”

इंदुरीकर महाराज बोलले त्यात गैर काय?- रुपाली पाटील

महत्वाच्या बातम्या-

सरकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार नाही- बच्चू कडू

‘शिवाजीचे उदात्तीकरण: पड्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला; भाजपची मागणी

मागच्या जन्मी पाप केलं तो ‘नगरसेवक’ आणि महापाप करतो तो ‘महापौर’ होतो- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या