परभणी | पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या शुभम मुस्तापुरेंबद्दल एक हृदयद्रावक माहिती समोर आलीय. दोन दिवसांनी सुट्टी घेऊन घरी येतो, असं त्यांनी नुकतंच आपल्या कुटुंबाला फोनवर सांगितलं होतं.
शुभम घरी येणार त्यामुळे घरचे आनंदात होते, मात्र आता शुभमचं तिरंग्यात गुंडाळलेलं पार्थिव घरी आलं आहे. शुभम असा परत येईल याची कल्पनाही मुस्तापुरे कुटुंबानं केली नव्हती.
दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील पूँछच्या कृष्णा घाटीत पाकिस्तानकडून झालेल्या गोळाबारात शुभम शहीद झाले. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
- मध्य प्रदेश सरकारकडून भय्यू महाराजांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा
- …तर खासदार संजय राऊत राज्यसभेचे उपसभापती होतील!
Comments are closed.