बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

मुंबई | आज तिथीनुसार राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शपथ दिली आहे. त्यातच शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी तिथीनुसार शिवजयंतीवरून शिवसेनेवर टीका केली आहे.

छत्रपतींचा दिवस रोज साजरा केला तरी कमी पडेल, असं राज ठाकरे सांगतात. त्यांचे विचार आणि आचार रोज लोकांना सांगितले पाहिजेत. यामुळेच राज ठाकरे यांनी आज सर्वांना शपथ दिली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आम्हाला शिवजयंती साजरी करता आली नाही. मात्र, आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनाचे संकट कमी झाल्याने सगळेजण उत्साहाने बाहेर आले आहेत. छत्रपतींनी जसं स्वराज्य स्थापन केलं. तसं महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन व्हावं, अशी राज ठाकरेंची इच्छा आहे, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहे. सत्तेत गेल्यापासून शिवसेनेला कदाचित विस्मरण झालं असेल, असा खोचक टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान,  सत्तेत असणारे सर्वजण छत्रपतींवर प्रेम करणारे आहेत. कोणी विरोध करणारं असेल असं वाटत नाही. मात्र, तिथीनुसार शिवजयंती का साजरी करत नाहीत. हा त्यांचा प्रश्न आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

“… तर भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल”

शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेली ‘ती’ इमारत रशियाकडून उद्ध्वस्त

“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More