बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा मोदींचा अधिकार”

पुणे | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  केंद्रातील या मंत्रिमंडळ विस्तारावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला थांबवायचं हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. या गोष्टीमध्ये आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करायची गरज नाही.

तसेच नरेंद्र मोदींकडे बघून सर्व खासदार निवडून आलेत. मोदी देशाचे पंतप्रधान होणार म्हणून जनतेने या लोकांना निवडून दिलं आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सर्वात आधी नारायण राणे यांंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सामावेश करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील आजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More