बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हॅाट्सॲपवरुन ओळख, मैत्री, प्रेम अन्… अक्षय बोराडेविरोधात पत्नीनं दाखल केला गुन्हा

पुणे | मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे विरोधात त्याची पत्नी रूपाली बोऱ्हाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल करत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. रूपाली यांनी अक्षय बोऱ्हाडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मी माझ्या बहिणीकडे कल्याण येथे शिक्षणासाठी 2016 मध्ये राहत होते. त्यावेळी फेसबुकवर मी अक्षयचे निराधार लोकांसाठी आणि मनोरूग्णांसाठी काम करतानाच्या व्हिडीओ क्लिप पाहिल्या. त्यानंतर माझ्या महाविद्यालयात एक मनोरूग्ण महिला दिसली तिच्यासंदर्भात मी अक्षय बोऱ्हाडेला फोन करत माहिती दिली. त्यावेळी त्याने मला त्याचा नंबर पाठवला. मी कल्याणला येऊन त्या महिलेला घेऊन जाईल असं अक्षय म्हणाला. त्यानंतर मला व्हॅाट्सॲपवर मेसेज करायचा, तो एक चांगलं काम करत आहे म्हणून मी त्यासोबत बोलायचे हळूहळू आमच्यातील बोलणं वाढलं आणि आम्ही फोनवरही बोलू लागलो, असं रूपाली बोऱ्हाडे यांनी सांगितलं.

दोन ते तीन महिन्यानंतर मला अक्षयने मला प्रपोझ केलं. त्यानंतर अक्षयने मला कल्याणला न राहता जुन्नरला बोलावून घेतलं. मी त्याचं ऐकून जुन्नर गेले आणि शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नरमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तो मला भेटण्यासाठी महाविद्यालयात भेटायला यायचा. आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. याच दरम्यान अक्षयने शिवऋण प्रतिष्ठानची स्थापना केली. एक दिवस अक्षयने मला लग्नाची मागणी केली. मात्र मला शिक्षण घ्यायचं असल्यामुळे मी नकार कळवला मात्र मी तुझं पुढचं शिक्षण करतो असं सांगितलं. त्यावेळी अक्षयने लग्नाचं अमिष दाखवून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर तो मला टाळू लागल्याने मी औषध पिलं होतं. त्यानंतर तो मला घरी घेऊन गेला आणि आई-वडिलांना सांगून आळंदी येथे माझ्यासोबत 29 डिसेंबर 2017 ला लग्न केलं.

जनतेच्या मनात तो शिवप्रेमी आहे हे रूजवण्यासाठी 30 डिसेंबरला जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्यासमोर पुन्हा लग्न केलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. मी सासरी शिरोली येथे गेले त्यावेळी सुरूवातीला मला त्याच्या घरच्यांनी चांगली वागणूक दिली मात्र काही दिवसानंतर अक्षय घरी पिऊन येऊ लागला. आमच्यात भांडणं झाली त्यानंतर अक्षयची बाहेरची लफडी मला समजलीत. मी याबाबत विचारणा केल्यावर मला अक्षयने मारहाण केली. मला माहेरला पाठवलं त्याकाळात आळे फाटा प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती. सुटून आल्यानंतर तो पुन्हा आला मला गोड बोलून मला घरी घेऊन गेला.

शिवऋण प्रतिष्ठान हा त्याचा उत्पादनाचा स्त्रोत होता. अक्षयने अनेक मनोरूग्णांना गायब केलं आहे. 21 मे 2020 मला मुलगा झाला त्यावेळी अक्षय मला पाहायला आला नाही. त्यावेळी मी माझ्या माहेरी गेली होते तेव्हा मला एका मुलीचा फोन आला त्यावेळी मला तिने अक्षयबाबत माहिती दिली. अक्षयने मला पुन्हा घरी नेलं, माझा पती काही काम करत नाही आणि प्रतिष्ठानच्या आलेल्या निधीचा चैनीसाठी वापर करत असल्याचं रूपाली यांनी सांगितलं.

दरम्यान, अक्षयच्या गाडीचालकाने मला फोन करत त्याची मला सर्व माहिती दिली. मी घरी नसताना तो मुलींना घरी आणतो त्यांच्यासोबत दारू पितो, याबाबत मी त्याला विचारणा केल्यावर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझा आणि तुझ्या बाळाचा काही संबंध नाही, असं म्हणाला असल्याचं रूपाली बोऱ्हाडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शहनाजवर आभाळ कोसळलं, वडिलांनी दिली मुलीच्या प्रकृत्तीबद्दल मोठी माहिती

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More