जळगाव महाराष्ट्र

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी

जळगाव | महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत.

भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा केल्याने त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. याबाबत अंजली पाटील यांनी आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा- राहुल गांधी

जनतेचा महाविकास आघाडीवर ठाम विश्वास- आदित्य ठाकरे

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या