बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी चुकीची कागदपत्रे देऊन अधिकारी झाले आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर दोघांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळाल आहे. अशातच आता या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला इशारा दिला आहे. क्रांती रेडकर यांनी संभाळून बोलावं. कारण त्यांचा जर इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांनी 4 हजार प्रवाशी असलेल्या क्रुझवर छापा टाकला पण त्यांना फक्त 6 जण ड्रग्स घेताना सापडले. बाकी 3,994 जण व्यवस्थित होते, पण असं कसं? असा सवाल मला पडल्याचं देखील जितेंद्र आव्हान यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, वानखेडेंच्या सर्टिफिकेटवर बोलताना सुधीर मुनगंटीवर म्हणाले होते, की राज्यात 90 हजार लोकांना बोगस सर्टिफिकेटर नोकऱ्या मिळाल्या आहे. म्हणजेच समीर वानखेडेंचं सर्टिफिकेट बोगस असल्याचं त्यांनी मान्य केलंय, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More