बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलन मस्क यांनी रचला इतिहास, कमावले 300 बिलियन डॉलर

नवी दिल्ली | अमेरिकेची प्रसिध्द कार उत्पादक टेस्ला कंपनी आणि स्पेसेक्स कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी हेर्ट्ज ग्लोबल होल्डींगकडून 1 लाख इलेक्ट्रीक कारची ऑर्डर करण्यात आली होती. त्यामुळे संपत्तीत वाढ झाली होती. त्यातच आता एलन मस्क जगात सर्वाधिक श्रीमंत असणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

एलन मस्क यांनी 300 बिलियन डॉलर संपत्ती कमावली आहे. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीत प्रथम  स्थानी आले आहेत. ब्लुमबर्ग मिलेनिअर अनुक्रमणिकेनुसार एलन मस्क यांची संपत्ती एकूण 300 डॉलरवर पोहोचली आहे. गुरूवारी एलन मस्क यांच्या संपत्तीत 10 बिलियन डॉलरची भर पडली आहे.

एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ होण्याचं कारण समोर आलं आहे. टेस्ला कंपनीचे शेअर्स वाढल्यामुळे एलन मस्क यांची संपत्ती वाढली आहे. 2021 वर्षाच्या सुरूवातीला एलन मस्क यांच्या संपत्तीत 119 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात कंपनीची किंमत 100 अब्ज डॉलरच्या घरात गेली होती.  ब्लुमबर्ग मिलेनिअर इंडेक्सनुसार  एलम मस्क यांची संपत्ती 302 बिलियन डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे एलम मस्क यांनी नविन विक्रम रचला आहे.

थोडक्यात बातम्या-

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…

अनेक स्वप्न पाहता, देव बुडवून बसले, आमची आघाडी मात्र भक्कम- बाळासाहेब थोरात

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

इंदिरा गांधींना माहित होतं की त्यांची हत्या होऊ शकते, तरीही…; प्रियंका गांधीचं मोठं वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More