बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

टोकियो | सध्या जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक सामने सुरू आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना काही खास कामगिरी करता आलेली नाही. सध्या भारत अंकतालिकेत 51 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या खात्यात सध्याचं एकच पदक आहे. त्यातच आता डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. सामन्याच्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटरचा स्कोर केला आहे. हा स्कोर केल्यानंतर कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. तिच्या या विजयाबरोबर भारताच्या आशा देखील उंचावल्या आहेत.

ग्रुप बीच्या सामन्यात पहिल्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 60.25 मीटरचा स्कोर केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिनं 63.97 मीटरचा स्कोर केला. या दोन्ही फेरीत तिनं चांगली कामगिरी केल्यानं ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. त्याच बरोबर तीनं फायनलमध्ये देखील प्रवेश केला आहे.

दरम्यान, कमलप्रीत कौरच्या या कामगिरीमुळे आता भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता आहे. काल खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय बाॅक्सर लवलीना बोर्गोहेनने भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. ती आता सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. आता लवलीना बोर्गोहेन आणि कमलप्रीत कौर कामगिरीमुळे भारत अंकतालिकेत मोठी झेप घेऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

पुण्यातील ‘फुकट बिर्याणी’ ऑर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट!

‘आपला लोकशाही देश आहे, त्यामुळे…’; न्यायालयानं शिल्पाला सुनावलं

तळियेनंतर ‘या’ 13 गावांना मोठा धोका; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More