बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय कर्णधार विराट कोहलीची बॅट थंडावली होती. गेल्या दोन वर्षात विराटने एकही आंतरराष्ट्रीय शतक केलं नाही. त्यामुळे विराटवर अनेकांनी टीका देखील केल्या होत्या. त्यानंतर आता आजच्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा 39 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात विराटने आक्रमक फलंदाजी केली. त्यावेळी त्याने टी- ट्वेटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.

मुंबई इंडियन्सचा स्टाईक गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या षटकात एक जबरदस्त सिक्स लावत त्याने हा पराक्रम केला आहे. 10 हजार धावा पुर्ण करायला विराटला 314 सामने खेळावे लागले. तर या लिस्टमध्ये रोहित शर्माचा देखील क्रमांक लागतो. त्याच्या 9348 धावा आहेत. तर त्याच्या खाली सुरेश रैना आणि शिखर धवनचा नंबर येतो.

दरम्यान, विदेशी खेळाडूंमध्ये ख्रिस गेल 14275 धावांसह अव्वल स्थानी आहे. तर कायरन पोलार्डच्या नावावर 11,195 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय यादीत विराटचा 5 वा क्रमांक लागतो. त्याचबरोबर तिन्ही फाॅरमॅटमध्ये विराटने 10 हजाराचा टप्पा पुर्ण केला आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्या आणि परवा राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

“शिवसेना रेसचा घोडा, घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट”

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

” मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाहीच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More