किमान 3-4 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलिस तुम्हाला काहीच करणार नाही!

अकोला | शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना कपडे काढून मारलं पाहिजे, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते अकोल्यातील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. 

राज्यभरातील गावागावात जाऊन भाषणं करत मिरवणाऱ्या आणि खोटी आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहीजे. नुसतंच ठोकायचं नाही तर कपडे काढून तुडवून-तुडवून मारलं पाहिजे, असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे. 

अकोल्यात तीन-चार मंत्र्यांना कपडे काढून ठोका. पोलिस तुम्हाला काहीच करणार नाहीत. कारण तेही सरकारला त्रासले आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

दरम्यान, त्यांच्या अशा आक्रमक वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार आणि श्रीनिवास पाटील एकत्र; उदयनराजेंचा पत्ता खरंच कट होणार?

-पहिला सामना अन् पहिलाच डाव; अवघ्या 18 वर्षीय पृथ्वीनं ठोकलं विक्रमी शतक

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये करोडपती ठरलेल्या महिलेला नेमके किती पैसे मिळाले?

-भल्याभल्यांना जमलं नाही, ते ‘पृथ्वी’नं करुन दाखवलं!

-गीता, बायबल आणि कुराणापेक्षा आम्हाला संविधान प्रिय- मुख्यमंत्री

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या