Loading...

या बड्या नेत्याने घेतला कधीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई | वसई तालुक्याची नाहक बदनामी होत असल्याचं सांगत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी यंदा लढवलेली निवडणूक शेवटची असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक लढवणार नसलो तरी राजकारण सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भावनिक साद घालण्यासाठी मी मतदानाअगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला भावनिक राजकारण खेळायचं नाही. मला मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता. त्यामुळे मी हा निर्णय मतदानानंतर घेतला, असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

वसई, नालासोपारा आणि भोईसर या तिन्ही ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणार. जर आमचे उमेदवार पडले तर तो नक्की ईव्हीएम घोटाळा असेल, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, वसई विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेचे विजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निकाल काहीही लागला तरी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय ठाकूर यांनी घेतला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

Loading...