भाजपच्या ‘विकास’लाही मिळाली उमेदवारी, उत्तर गुजरातमधून लढणार!

गांधीनगर | ‘विकास गांडो थायो छे’ या विरोधकांच्या कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी भाजपने ‘मी आहे विकास, मी आहे गुजरात’ नावाची जाहिरात काढली होती. या जाहिरातीतील विकास अर्थात हितेश कनोडियाला भाजपनं उमेदवारी दिलीय. 

हितेश कनोडिया गुजरातमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. जाहिरातीच्या माध्यमातून भाजपने त्याचा आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी वापर केला, त्यानंतर आता त्याला उत्तर गुजरातमधील ईदमधून उमेदवारीही देण्यात आलीय. 

दरम्यान, 2012 मध्येही त्याने भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेस उमेदवार रमेश चावडा यांनी त्याचा 1200 मतांनी पराभव केला होता.