‘हिटमॅन’ रोहीत शर्माचं धमाकेदार शतक

सिडनी | टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दिमाखदार शतक झळकावलं आहे. 110 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावा ठोकल्या, त्यांच हे कारकिर्दीतील 22 वं शतक ठरलं आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या 289 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच धक्के बसले. शिखर धवन 0, विराट कोहली 3 आणि अंबाती रायडू 0 धावांवर माघारी परतले.

यानंतर दिनेश कार्तिकने रोहित शर्माला साथ देली, मात्र तो 21 चेंडूत 12 धावा करुन माघारी परतला. 

दरम्यान, भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 2 बळी मिळाले, तर रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.

महत्वाच्या बातम्या-

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार