माऊंट मोऊनगुई | भारत आणि न्युझीलंडचा आज दुसरा एकदिवसीय सामना चालू आहे. पहिल्या सामन्यात आपली फलंदाजीने जादू न दाखवू शकणारा ‘हिटमॅन’ शर्माची खेळी पुन्हा संपुष्टात आली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याचं शतक 13 धावांनी हुकलं आहे.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, भारताच्या सामन्याची सुरुवात भक्कम झाली. मात्र शिखर धवन 66 धावांवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ रोहित शर्मा 87 धावा करत बाद झाला.
नेपियरच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडवर सहज मात केल्यानंतर विराट कोहलीचा संघ आता दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सहज जिंकल्यामुळे विजयाची लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड
-स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल
-युवराज सिंगची जबरदस्त खेळी, मुंबई इंडियन्स म्हणते…, पाहा व्हीडिओ-
-संघाचा देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा डाव- राहुल गांधी
-वीर सावकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया