Top News

शिवसेना, राष्ट्रवादी आपल्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार

Loading...

मुंबई | देशावर कोरोनाच्या रुपाने मोठं संकट आलं आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदार-खासदारांचा एक महिन्याचा निधी कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी सहाय्यक निधीला  देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्रांच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे एक महिन्यांचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...

कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत, असं सुभाष देसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी ट्विवट केल आहे. त्यामध्ये एक पत्रकही जारी केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

 जिंदादिल बच्चू कडूंनी ओळखली सामाजिक जबाबदारी; एक महिन्याचा पगार देणार कोरोनाच्या लढाईसाठी

भारताने योग्य वेळी योग्य पावलं उचलली आहेत; पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडून सरकारचं कौतुक

महत्वाच्या बातम्या-

ज्ञानदा काय तुमच्या घरात कामाला आहे काय रे… ट्रोलर्सचा चाकणकरांनी घेतला यथेच्छ समाचार

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात…

राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या