नागपूर महाराष्ट्र

“निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

नागपूर | शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, असंही फडणवीसांनी म्हटलंय. ते नागपुरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीचा सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

दरम्यान, 2020 हे वर्ष आव्हानात्मक होतं, 2021 हे वर्ष सुखा समाधानाचं जावो हीच शुभेच्छा असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! भरदिवसा चौकात चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

राज्यातील ‘या’ चार शहरांमध्ये 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार- राजेश टोपे

‘उंचे लोगों की नीची पसंद है’; मुकेश खन्नांचा अजय देवगणला टोला

मुकेश अंबानींसाठी बॅडन्यूज; 2020नं जाताजाता त्यांनाही दिला दणका!

गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या