बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यापार, उद्योगधंदे बंद पडले. आता लॉकडाऊनला जवळजवळ एक महिना लोटला आहे. त्यामुळे देशावर सध्या आर्थिक मंदीच सावट आहे. यासाठी केंद्र सरकार काटकसर करत अनेक उपाययोजना राबवत आहे. यावरून शिवसेनेने आपल्या पक्षाच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गावठी उपाय म्हणजे दात कोरून देश चालवण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे जनतेच्याच आतड्यांना व खिशाला कात्री लावणे असेल, तर ते करण्यासाठी अर्थमंत्र्यांची गरज नसते, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

केंद्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला आहे. त्याने काय होणार? सरकारने खासदारांचा विकासनिधी दोन वर्षांसाठी थांबवला आहे. खासदारांचे पगार कापले. हे झाले घरगुती, गावठी उपाय, पण कमाईची आणि महसुलाची कोणती नवी साधने सरकार निर्माण करत आहे?, असा सवालही शिवेसेनेने केला आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेवर कोणी काम करायला तयार नाही. रघुराम राजन हे देशाला सेवा देण्यास तयार होते, त्यांची सेवा सरकारला नको झाली. कारण सरकारच्या ‘पेढी’छाप अर्थव्यवस्थेस त्यांनी विरोध केला, अशा शब्दात शिवसेनेने केंद्र  सरकारच्या आर्थिक उपाययोजनांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More