Danish Ahmed - तरुणींना आकर्षित करण्यासाठी ते दहशतवादाचा रस्ता पकडतात!
- देश

तरुणींना आकर्षित करण्यासाठी ते दहशतवादाचा रस्ता पकडतात!

श्रीनगर | स्थानिक तरुणींना आकर्षित करण्यासाठी काश्मीरमधील तरुण दहशतवादाचा रस्ता पकडतात, असा धक्कादायक खुलासा हिजबूलचा दहशतवादी दानिश अहमदने केला आहे. दानिश नुकताच सुरक्षा दलांना शरण आला, त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

अनेक तरुण दहशतवादी सुरक्षा दलांना शरण येण्यास तयार आहेत, मात्र हिजबुलचा त्यांच्यावर दबाव आहे. हिजबूल सोडली तर जीवे मारण्यात येईल, अशा धमक्या त्यांना मिळत आहे, असंही दानिशनं सांगितल. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा