पुन्हा लॉकडाऊन लागणार?; धडकी भरवणारी बातमी समोर

HMPV

HMPV | गेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महासाथीने जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या महासाथीतून सावरत असतानाच आता चीनमधूनच आणखी एक विषाणू समोर आलाय. या विषाणूचे नाव HMPV असून चीनमध्ये अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा भारतातही शिरकाव झाला आहे. देशात सर्वप्रथम बेंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुरडीला या विषाणूची लागण झाली आहे.

HMPV हा एक मोठा आजार म्हणून समोर येऊ शकतो आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची लागणी होऊ शकते. या आजारावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस नाही. त्यामुळे याचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी, भारतात त्याचा जास्त फैलाव होऊ नये यसाठी सावधगिरी दाखवत दिल्ली सरकारने यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

लहान मुलांना HMPV ची लागण

एचएमपीव्हीची लागण झालेले दोन्ही रुग्ण एका वर्षापेक्षा कमी वय असलेली लहान बाळं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या बाबतची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडयावर दिली. या दोन लहान बाळापैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

HMPV व्हायरसची लक्षणं-

ताप आणि खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, नाक बंद होणं, घसा खवखवणं ही लक्षणे आहेत. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो. हाथ मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो.

या रोगाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. कोणीही संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाइन करण्यात यावं आणि योग्य ती खबरदारी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावं. तसेच तीव्र श्वसन संसर्गाने ग्रस्त असतील अशा रुग्णांचे डॉक्यूमेंटेशन करणेही बंधनकारक आहे, अशी सूचना देण्या आल्या आहेत. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची असलेली औषधे असलीच पाहिजेत, अशीही सूचना देण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

HMPV चा सर्वाधिक धोका लहान मुलांना?, देशात आतापर्यंत किती केसेस आढळल्या?

सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी

सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…

खंडणी ते हाफ मर्डर..; वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेही अट्टल गुन्हेगार, गुन्ह्यांची यादीच समोर

खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .