अलर्ट! महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, ‘या’ ठिकाणी आढळले रुग्ण

HMPV Patient In Maharashtra

HMPV Patient In Maharashtra | चीनमध्ये सध्या एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) या नव्या व्हायरसने थैमान घातल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये आढळला होता. हा विषाणू आता पुन्हा नव्याने फैलावत चालल्याचे समोर आले आहे. चीनमधील नव्या व्हायरसने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. (HMPV Patient In Maharashtra)

भारतातही याचे काही रुग्ण आढळले आहेत.सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता महाराष्ट्रातही या विषाणूचा शिरकाव झाल्याचं समजतंय. राज्यात नागपुरात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत.यात लहान मुलांचा समावेश आहे.

नागपुरात आढळले 2 रुग्ण?

दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला या विषाणूची लागण झाली असल्याचं बोललं जातंय. यामुळे नागरिकांची देखील धाकधूक वाढली आहे. दोन्ही लहान मुलांना 3 जानेवारीरोजी HMPV ची लागण झाल्याचं निदान झालं होतं.

दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून आली. मात्र, सध्या त्यांची प्रकृती एकदम ठीक असून ते आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. दोघांमध्येही सामान्य लक्षणं दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे त्यांना औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आलं.

दरम्यान, चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत काही नियमावली देखील बनवण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या नियमावलीबाबत अधिक जाणून घेऊयात. (HMPV Patient In Maharashtra)

काय करावे?

खोकला आल्यास त्वरित तोंड-नाक झाकावे
सतत हात स्वच्छ ठेवा आणि धूत राहा
ताप किंवा खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
पोषणयुक्त आहार घ्या, बाहेरचे खाणे टाळा
घरात खेळती हवा ठेवा (HMPV Patient In Maharashtra)

काय करू नये?

सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन करू नका
एकाच रुमालचा सतत वापर टाळा
आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा
डोळे-नाक-तोंड याला सतत स्पर्श करू नका
सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका
डॉक्टरांना न विचरता कोणतीही औषधी घेऊ नका (HMPV Patient In Maharashtra)

News Title : HMPV Patient In Maharashtra

महत्वाच्या बातम्या –

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती?, पाहा संपूर्ण लिस्ट

आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?

’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

आता आरोपींची खैर नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .