HMPV Update | कोरोना या व्हायरसनंतर चीनमध्ये आणखी एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) या नव्या व्हायरसने थैमान घातल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये आढळला होता. हा विषाणू आता पुन्हा नव्याने फैलावत चालल्याचे समोर आले आहे. भारतात याचे 2 रुग्ण आढळल्याची माहिती आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. (HMPV Update)
त्यामुळे लहान मुलांना या विषाणूचा सर्वाधिक धोका तर नाही?, अशी भीती व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रात तरी सध्या याचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, आरोग्य विभागाने आतापासूनच कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत काही नियमावली देखील बनवण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या नियमावलीबाबत अधिक जाणून घेऊयात.
काय करावे?
खोकला आल्यास त्वरित तोंड-नाक झाकावे
सतत हात स्वच्छ ठेवा आणि धूत राहा
ताप किंवा खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
पोषणयुक्त आहार घ्या, बाहेरचे खाणे टाळा
घरात खेळती हवा ठेवा (HMPV Update)
काय करू नये?
सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन करू नका
एकाच रुमालचा सतत वापर टाळा
आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा
डोळे-नाक-तोंड याला सतत स्पर्श करू नका
सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका
डॉक्टरांना न विचरता कोणतीही औषधी घेऊ नका (HMPV Update)
News Title : HMPV Update 2 cases detected in India
महत्वाच्या बातम्या –
सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी
सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…
खंडणी ते हाफ मर्डर..; वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेही अट्टल गुन्हेगार, गुन्ह्यांची यादीच समोर
खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
सरपंच हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, SIT मधून ‘त्या’ अधिकाऱ्यांना हटवलं