HMPV ने चिंता वाढवली, राज्यात ‘या’ ठिकाणी 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह

HMPV Virus 6 month baby patient in mumbai

HMPV Virus | चीनमध्ये थैमान घातलेल्या Human Metapneumovirus (HMPV) या नव्या व्हायरसने आता भारतात देखील एंट्री केली आहे. इतकंच काय तर महाराष्ट्रात देखील याचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर नागपुरात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले. अशात मुंबईतही याचा एक रुग्ण आढळला आहे. (HMPV Virus )

मुंबईत चक्क एका 6 महिन्याच्या बाळाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती आहे. 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह आल्याने मुंबईत चिंता वाढली आहे. 1 जानेवारी रोजी या सहा महिन्याच्या बाळाला खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्याची मेटा न्यूमोव्हायरसची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे मुंबईत आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

मुंबईत लहान बाळाला लागण

देशात आतापर्यंत 6 बाधित रुग्ण आढळले असून अहमदाबादमध्ये 1, बेंगळुरूमध्ये 2, चेन्नईत 2 आणि कोलकात्यात 1 अशा मेटा न्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) लागण झाली होती. यानंतर महाराष्ट्रातही नागपूर येथे मेटा न्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन संशयित रूग्ण आढळले. त्यात आता मुंबईतही एका लहान मुलाला याची लागण झाल्याची माहिती आहे. (HMPV Virus)

दरम्यान, चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत काही नियमावली देखील बनवण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

काय करावे आणि काय करू नये?

खोकला आल्यास त्वरित तोंड-नाक झाकावे
सतत हात स्वच्छ ठेवा आणि धूत राहा
ताप किंवा खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
पोषणयुक्त आहार घ्या, बाहेरचे खाणे टाळा
घरात खेळती हवा ठेवा

सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन करू नका
एकाच रुमालचा सतत वापर टाळा
आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा
डोळे-नाक-तोंड याला सतत स्पर्श करू नका
सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका (HMPV Virus )
डॉक्टरांना न विचरता कोणतीही औषधी घेऊ नका.

News Title :  HMPV Virus 6 month baby patient in mumbai

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार

पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार

बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह

राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .