HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर

HMPV Virus dr shekhar mande big statement

HMPV Virus | जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एका नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील नव्या व्हायरसने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. देशात सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले काही रुग्ण आढळले. यानंतर महाराष्ट्रात देखील याचा शिरकाव होत असल्याचं दिसून येतंय. नागपुरात दोन नवे रुग्ण या विषाणूचे आढळून आले. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलंय. (HMPV Virus)

यामुळे महराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली असून नागरिकांसाठी देखील काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचं महत्वाचं विधान समोर आलंय. त्यांनी या विषाणूबाबत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीयांना जास्त धोका नाही

एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही.या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी म्हटलंय.

या व्हायरसची कोरोना सारखीच लक्षणे आहेत. मात्र, घाबरून जायचे कारण नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही. या व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अँटिबाडीज आहेत.त्यामुळे घाबरून जाऊ नका.कोरोना सारखा हा नवीन व्हायरस नाहीये. भारतात देखील हा व्हायरस नवीन नाही. जुनाच व्हायरस असल्याने त्याचा जास्त धोका नाही, असंही डॉक्टर शेखर मांडे म्हणाले.तसेच, नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती नाही. मात्र, खबरदारी म्हणून मास्क वापरू शकता, असंही ते पुढे म्हणाले. (HMPV Virus)

अशी घ्या काळजी-

  • -खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा
  • साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरने आपले स्वच्छ ठेवा
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे उपचार घ्या आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा (HMPV Virus)

News Title : HMPV Virus dr shekhar mande big statement

महत्वाच्या बातम्या –

पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले; राऊतांचा सरकारवर निशाणा

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, SIT बरखास्त करून…; मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी कुणी केली?

आनंदवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या दर?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .