HMPV Virus l चीनमध्ये HMPV या व्हायरसने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अशातच आता भारतामध्ये देखील या व्हायरसने एन्ट्री केली आहे. कारण आज HMPV चा पहिला रुग्ण बंगळुरूत आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्टमोडवर आली आहे. बंगळुरूमध्ये एका 8 महिन्याच्या मुलाला HMPV या व्हायरसची लागण झाली आहे.
आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर :
भारतात देखील HMPV या व्हायरसने प्रवेश केल्याने चिंतेचे वातावरण आहे. या दरम्यान HMPV या व्हायरसचा सामना करण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वं देखील जारी केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महासंचालक डॉ. वंदना बग्गा यांनी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि आयडीएसपीचे राज्य कार्यक्रम अधिकारी यांची आज बैठक घेतली. यावेळी दिल्लीतील श्वसनाच्या आजारांना सामोरे जाण्याच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
HMPV Virus l सूचना काय आहेत? :
– इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि जास्त प्रमाणात श्वसन संक्रमणचे कोणतेही प्रकरण समोर आल्यास IHIP पोर्टलद्वारे त्याची माहिती त्वरित कळवावी, असे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
– संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाइन करण्यात यावे.
– खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
– तसेच ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
HPMV या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची औषधे अणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, अँटीहिस्टामाईन, पॅरासिटीमॉल आणि कफ सिरप हे औषधे असणे गरजेचे आहे.
News Title : HMVP virus health officials issued guidelines
महत्वाच्या बातम्या –
HMPV चा सर्वाधिक धोका लहान मुलांना?, देशात आतापर्यंत किती केसेस आढळल्या?
सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी
सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…
खंडणी ते हाफ मर्डर..; वाल्मिकसह सुदर्शन घुले व सांगळेही अट्टल गुन्हेगार, गुन्ह्यांची यादीच समोर
खळबळजनक! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी