…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!

भुवनेश्वर | स्टेडियमच्या व्हीआयपी कक्षामध्ये शिरलेल्या भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंना हॉकी इंडियाच्या सीईओंनी अक्षरशः हाकलून लावलं.  मंगळवारी हाॅकी विश्वचषकातील नेदरलँड आणि कॅनडा सामन्यादरम्यान हा प्रकार घडला.

सामना चालू असताना खेळाडूंना व्हीआयपी कक्षात यायला परवानगी नसते, मात्र तरीही चार खेळाडू आणि प्रशिक्षक हरेंदरसिंग स्टेडियममधल्या व्हीआयपी कक्षामध्ये आले होते.

हा प्रकार पाहताच हाॅकी इंडियाच्या सीईओंचा पार चढला. आताच्या आता इथून निघून जा, अशा कडक शब्दांत त्यांनी खेळाडूंना सुनावलं. 

दरम्यान, मनप्रीतसिंग, मनदीपसिंग, गुर्जंतसिंग, कृष्णन पाठक या खेळाडूंनी आपली चूक मान्य केली तसेच माफीही मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

-काॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर

-काँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार

-शुभमंगल सावधान… ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबंधनात

-शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला