बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत

मुंबई | होळीचा सण जवळ आला आहे. या सणला थोडी धमाल, थोडी मस्ती पहायला मिळते. होळीच्या दिवशी एकमेकांना रंग आणि गुलाल उधळले नाही तर मजाच फिकी पडते. यं रंगाच्य मस्तीत त्वचेची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

अनेक प्रकारचे रासायनिक रंग बाजारात उपलब्ध आहेत. रासायनिक रंगांनी होळी खेळल्यानं त्वचेवर मुरुम, अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. दुसरीकडे, हर्बल रंगांनी होळी खेळल्याने तुमची त्वचा चमकदार राहते. घरी हर्बल कलर कसा बनवायचा त्याबाबत जाणून घेऊया.

हिरवा रंग बनवण्यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून बारीक करून त्याची पावडर किंवा पेस्ट बनवा. कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कडुनिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि ऍलर्जीक गुणधर्म असतात ज्यामुळे मुरुम यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

केशरी रंग बनवण्यासाठी पलाशच्या फुलांचा वापर करा. यासाठी होळीच्या एक दिवस मध्यरात्री पलाशची फुले पाण्यात टाकावीत. लाल रंगासाठी बीट बारीक करून पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार करता येतो. गुलाबी किंवा लाल रंगासाठी तुम्ही बीट वापरू शकता. जर तुम्हाला डार्क गुलाबी रंग हवा असेल तर बीट वाळवून बारीक करून त्याची पावडर बनवा. त्यामुळे घरच्या घरी शक्य तेवढे कलर बनवा आणि निरोगी रहा.

थोडक्यात बातम्या – 

पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

“रोहित माझा कॅप्टन नाही, विराट कोहलीला कॅप्टन बनवा”

देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ

‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंच्या नव्या दाव्यानं खळबळ

धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More