Ahmednagar l गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. या रॅलीला राज्यभरातून चांगला प्रतीसाद मिळत आहे. अशातच आता ही रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे.
या दिवशी अहमदनगरमधील शाळांना सुट्टी :
कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शांतता रॅली १२ ऑगस्टला अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे. त्यावेळी या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता दाट वर्तवली आहे. मात्र या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शांतता रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते, त्यामुळेच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या दिवसाची तासिका ही इतर कोणत्याही दिवशी भरून काढवीत असे देखील आदेशात म्हटले आहे.
Ahmednagar l मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे :
मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने तातडीने सगेसोयरेंची अधिसूचना जारी करावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या प्रलंबित मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात केली आहे. या शांतता रॅलीला राज्यभरातील मराठा बांधवांची गर्दी होत आहे.
मनोज जरांगे पाटील शांतात रॅलीला संबोधित करताना राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे असताना आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी देखील केली. तसेच कोल्हापूर येथील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला सज्जड दम दिला आहे.
News Title : Holiday announced for all schools in Ahmednagar
महत्त्वाच्या बातम्या-
पावसाची विश्रांती; ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार
या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता
14 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरचा रोमांन्स, व्हिडीओ होतोय व्हायरल!
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!
Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!