बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रमजान ईदनिमित्त गृह विभागाकडून ‘या’ मार्गदर्शक सुचना जारी 

मुंबई | राज्यात कोरोनाचं संकट वाढतच आहे. त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ या मोहीमेअंतर्गत राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी कोणताही सण जल्लोषात साजरा करता येणार नाही आहे.

यंदा मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद साध्या पद्धतीनं घरच्या घरीच साजरी करावी लागणार आहे. मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना नमाज पठणासाठी एकत्र येण्यास परवानगी नाही. शिवाय इतरही काही मार्गदर्शक सूचनांचं त्यांनी पालन करणं बंधनकारक असणार आहे. यावर्षी 13 एप्रिल 2021 पासुन मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली. 13 किंवा 14 मे 2021 रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाने 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशांचे पालन रमजान ईदला करणे अनिवार्य राहील. त्यानुसार रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागामार्फत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कलम 144 लागू असल्यानं तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

दरम्यान, रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचंदेखील पालन करावं.

थोडक्यात बातम्या

‘सोनिया गांधी सामनाची दखल घेतात’; संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे

खुशखबर! 2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची ‘ही’ लस

कोरोना रूग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डाॅक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या ‘या’ जिल्ह्याच्या पॅटर्नची चर्चा संपुर्ण राज्यभरात सुरू

‘अजितदादा मराठ्यांचा घात करू नका’; मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More