Home High Rate | एका अहवालानुसार देशातील प्रमुख 8 शहरांमधील घरांच्या किंमतीत वाढ होऊ लागली आहे. घराच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. 2024 मधील पहिल्या तिमाहीतील आकडेवारी धडकी भरवणारी आहे. दिल्ली, बंगळुरू, मुंबई-मुंबई उपनगर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता आणि पुणे शहरात घर घेणं म्हणजे आता अवघड होऊन बसलं आहे. (Home High Rate)
देशातील प्रमुख 8 शहरांच्या घराच्या किंमतीत वाढ
वरील आठ शहरांमध्ये किती टक्के घरांच्या किंमतीत वाढ (Home High Rate) होणार याबाबत आता माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये सर्वाधिक 19 टक्के घरांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं समजतंय. तसेच चेन्नईमध्ये 4 टक्के घरांच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली. इतर शहरांमध्ये 2 ते 7 टक्के घराच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Home High Rate)
आपलं हक्काचं स्वत:चं घर असणं अनेकांचं स्वप्न असतं. बंगळूरूमध्ये सध्या सिलीकॉन व्हॅलीचं मार्केट आहे. याचा परिणाम हा घरांच्या किंमतींवर (Home High Rate) झाला आहे. यामुळे बंगळूरू शहरामध्ये तब्बल 32 टक्के घरांच्या किंमतीत वाढ होताना दिसली आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये सातत्याने मागणी वाढताना दिसत आहे. घराच्या किंमतीत 16 टक्क्यांपर्यंत वाढ होताना दिसत आहे. द्वारका एक्सप्रेसवेच्या जवळपास घर घेणे अत्यंत महागडं आहे. या भागात किंमती 23 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. अहमदाबादमध्ये देखील घरांच्या किंमतीत 13 टक्क्यांनी वाढ (Home High Rate) झाली आहे.
पुणे आणि मुंबईत किती टक्के वाढ झाली?
पुणे शहरात देखील घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर मुंबईच्या उपनगरांमध्ये म्हणावी अशा घरांच्या किंमतीत वाढ झाली नाही. केवळ मुंबई उपनगरात 6 टक्के घराच्या किंमतीत वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे. तर हैदराबादमध्ये 9 टक्क्यांपर्यंत घराच्या किंमतीत वाढ झाली आहे.
News Title – Home High Rate In India CREDAI Colliers Liases Foras
महत्त्वाच्या बातम्या
“…तर मी निवृत्ती घेतली असती”; देवेंद्र फडणवीसांचं सर्वांत मोठं वक्तव्य
शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना झापलं, म्हणाले…
Netflix यूझर्सना धक्का; ‘हे’ लोकप्रिय फीचर होणार बंद
“मोदींनी पराभव स्वीकारावा, भाजपला फक्त..”; लोकसभेच्या निकालाबाबत ‘या’ नेत्याचा मोठा दावा
अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?