Beauty Skin l आजकाल बाजारात आपल्याला कोरियन स्कीन केअर रूटीनची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत आहे. ही वाढती क्रेझ पाहता अनेक मोठं मोठे ब्रँड्स त्यांची कोरियन स्कीन केअर प्रोडक्ट्स बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. कारण आजकाल भारतातील प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे की, तिला कोरियन ग्लास स्कीन मिळावी. त्यामुळे बाजारातील अशा उत्पादनांवर अधिक खर्च केला जात आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? तुम्ही घरबसल्या असे उत्पादने तयार करू शकता, जे की तुमची त्वचा अधिक उजळू शकेल.
कोरियन स्कीनकेअर होतेय लोकप्रिय :
सध्या कोरियन स्कीनकेअर प्रचंड लोकप्रिय होत आहे. कारण हे लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे एकतर हे नैसर्गिक पदार्थांनी तयार केले जात आहे. तसेच दुसरं कारण म्हणजे ही उत्पादने त्वचेत खोलवर जाऊन त्वचेतील घाण स्वच्छ करतात. यामुळे त्वचेवरील समस्या तर कमी होतातच, मात्र याबरोबरच नवीन उध्दभवणाऱ्या समस्या देखील खूप कमी होत आहे.
तर कोरियन स्कीनकेअरमध्ये चक्क घरगुती तांदळाचा वापर करून अनेक उत्पादने तयार केली जात आहेत. यामध्ये तांदळाच्या पाण्याचा देखील वापर करून तयार करण्यात आलेले क्रीम, क्लीनजर आणि फेसपॅक यांचा समावेश आहे. कारण तांदळाचे पाणी हे हायपरपिग्मेंटेशन, वृद्धत्वाच्या खूणा, सन टॅन यांसारख्या समस्यांवर काम करते.
Beauty Skin l घरच्या घरी बनवा राइस वॉटर फेस वॉश :
याशिवाय तांदळाचे पाणी हे आपल्याला ग्लास स्कीन मिळवून देण्यास देखील सक्षम आहे. एवढंच नव्हे तर तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होऊन त्वचेवरील तेज प्रचंड प्रमाणात वाढते. याशिवाय तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे, डाग देखील कमी होतात. त्यामुळे आपण घरबसल्या देखील तांदळाच्या पाण्याचा वापर करून अशी काही उत्पादने तयार करू शकतो. तर आज आपण राइस वॉटर फेस वॉश नेमका कसा तयार करायचा हे जाणून घेऊयात…
घरच्या घरी राइस वॉटर फेस वॉश तयार करण्यासाठी तुम्हाला तांदूळ, बदामाचे तेल, पाणी, बेबी फेश वॉश आणि गुलाब जल या गोष्टी आवश्यक आहेत. हा फेशवॉश बनवण्यासाठी प्रथमतः तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. यानंतर सकाळी या पाण्यात थोडे तांदूळ टाकून मिश्रण रकडं बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात ही बनलेली पेस्ट नीट शिजवून घ्यावी.
यानंतर तयार झालेल्या मिश्रणात योग्य प्रमाणात गुलाबजल आणि बदामाचे तेल टाकून मिश्रण चांगले एकजीव करावे. त्यानंतर यामध्ये बेबी फेश वॉश मिसळून ते एका बाटलीमध्ये झाकण बंद करून भरून ठेवावे. अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी राइस वॉटर फेस वॉश तयार होईल. तर मुलींनो तुम्ही या फेसवॉशने रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवावा. त्यानंतर अवघ्या काही तुम्हाला तुत्वचेवर परिणाम दिसेल.
News Title : Home Made Skin Fash Wash
महत्वाच्या बातम्या –
पितृपक्षात पूर्वज ‘या’ चार रूपात येतात, चुकूनही त्यांचा अपमान करू नका
खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट
बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी; देवस्थान समितीचे सदस्य म्हणाले…
सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता