बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असतानाही राजधानी दिल्लीत हिंसाचार होतोच कसा? हे सर्वोतोपरी राज्याच्या गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्री अमित शहा यांना हे सांभाळणं जर जमत नसेल त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशीमागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हिंसाचार झाला. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ट्रम्प यांचा दौरा सुरु असताना दिल्लीत दंगल होतेच कशी? याचं स्पष्टीकरण अमित शहांनी देशाला द्यावं. गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी?, असा सवाल करत अमित शहांना हे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसाचारामध्ये एका पोलिसासह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकजण यामध्ये गंभीररित्या जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

आज वो हुए मशहूर जो काबिल न थे…- देवेंद्र फडणवीस

‘हे सरकार तर गजनीचा बाप’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More