Top News

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शहा यांनी सांगितलंय.

अमित शहा यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असं ट्विट अमित शहांनी केलंय.

माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असंही अमित शहा यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

‘राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलंय’; ‘या’ भाजप खासदाराचा घरचा आहेर

श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही- जितेंद्र आव्हाड

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; अंकिता लोखंडेने सोडलं मौन

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या