रायपूर | छत्तीसगडमधील सुकमा आणि जबलपूर जिल्ह्यांच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. त्या चकमकीत भारतीय सैन्याचे 22 जवान शहिद झाले आहेत. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अमित शहा यांनी सुकमा आणि जबलपूर जिल्ह्यांच्या सीमेवर जाऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे.
जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. आम्ही ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगढच्या जनतेला आणि संपुर्ण देशवासियांना मी आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातला लढा आणखी तीव्र करण्यात येईल. पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्यावतीने या नक्षलवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं अमित शहा म्हणाले.
नक्षलवादाविरोधात लढाई करताना जवानांनी दिलेले बलिदान देश कायम लक्षात ठेवेल. हा लढा आमच्या कायम लक्षात राहिल. आता ही लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली असून नक्षलवादाविरोधातली ही लढाई अधिक तीव्र करण्यात येईल, असं अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यामध्ये हा लढा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील सुकमा आणि जबलपूर जिल्हातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊन नक्षलवादाविरोधात कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं. तारेम येथून निघालेल्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. 3 तास या दोन्ही गटात चकमक झाली. त्यानंतर या चकमकीत 5 जवान शहिद झाले होते. तर बाकी 17 जवान बेपत्ता होते. तर या चकमकीत 30 जवान जखमी झाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”
“अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु”
“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”
उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.