Top News देश

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

नवी दिल्ली |  केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. आठवड्याभराच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे, संबंधित वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. (Home Minister Amit Shaha Tested Corona Negative)

गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तिसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. (Home Minister Amit Shaha Tested Corona Negative)

2 तारखेला अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. स्वत: ट्विट करून त्यांनी माहिती दिली होती. दिल्लीतल्या मेदांता रूग्णालयात गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  (Home Minister Amit Shaha Tested Corona Negative)

कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असं अमित शहा यांनी ट्विट करून सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

संरक्षण खातं बनणार आत्मनिर्भर; राजनाथ सिंह यांनी केली मोठी घोषणा…

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

‘या’ महिन्यापर्यंत फेसबुक कर्मचारी करू शकतात घरून काम, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या