बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांची जीभ घसरली

नवी दिल्ली | भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शहांनी (Home Minister Amit Shah) 12 सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे एका सभेत हजेरी लावली होती. कोऑपरेटिव्ह डेअरीची हीी सभा होती. यावेळी त्यांनी केलेल्या एका भाषणाचा व्हि़डिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमित शहा म्हणत आहेत. “1969-70 च्या काळात भारतातील प्रत्येक व्यक्तीला माणसी 40 ग्रॅम दूध मिळत होतं, मात्र कोऑपरेटिव्ह (Cooperative) डेअरी मुळं 2021-22 मध्ये प्रती व्यक्तीला 155 ग्रॅम दूध उपलब्ध होत आहे.”

यामध्ये अमित शहांनी दूधाचा उल्लेख ग्रॅम मध्ये केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने हाच मुद्दा बनवला आहे. काँग्रेस नेता सुरेंद्र रजपूत यांनी लिहलय की ”शहांनी दुधाचा उल्लेख ग्रॅममध्ये केला आहे. आता त्यांना वेडे, कमी डोक्याचे म्हणण्याची हिंमत करा जसं आमच्या नेत्यांना बोलता.”

दरम्यान, काँग्रेसचे नेते पीठ लीटर मध्ये मोजतात तर भाजप नेते दूध ग्रॅममध्ये मोजतात. त्यांंमुळे दोनी पक्षाकडे आपले आपले पप्पू आहेत, असं आप नेता आशुतोष सेंगर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या 

मनसेचं ठरलं? शिंदे गटासोबतच्या युतीबाबत राज ठाकरे म्हणाले…

डीप नेक ड्रेसवरील मलायकाचा हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More