बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असाही एक गृहमंत्री… कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा रस्त्यावर वाढदिवस केला साजरा

पुणे |  कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत साजरा झाला तर? किवळे फाटा येथे कर्तव्य बजावणारे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना हे भाग्य लाभलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने जाधव भारावले.

गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी पुणे येथे दौऱ्यावर होते. काल सकाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर थोडा वेळ थांबून त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अडीअडचणींबाबत चर्चा केली.

या चर्चेदरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही  कुटुंबापासून दूर आपले कर्तव्य  बजावणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले.  केवळ कौतुकच नव्हे तर  राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री श्री. देशमुख पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले.त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.  त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले.

दस्तुरखुद गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होत आहे. हे पाहून जाधव व तेथील उपस्थित सर्व पोलीसअधिकारी,कर्मचारी आनंदले. अशा प्रकारे साजरा केलेला हा वाढदिवस श्री. जाधव यांच्या कायम स्मरणात राहील.

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

सोनू तू राऊतकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही- चित्रा वाघ

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More