बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. इंटिरिअर डिझाईनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुनर्चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिपब्लिक टीव्हीने अन्वय नाईक यांची देणी थकवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत येताच अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी देखील याप्रकरणी लवकरच चौकशीचे आदेश देण्यात येतील, असं सांगितलं होतं.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अलिबाग पोलिसांनी ही केस व्यवस्थित तपासली नाही त्यामुळे मी या प्रकरणी पुन्हा व्यवस्थित चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिल्याचं देशमुख यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सावधान, पुणे जिल्ह्यातही कोरोना पसरतोय हातपाय; मागच्या काही तासातील आकडेवारी धक्कादायक

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींचं ‘ते’ वक्तव्य गंभीर, संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More