राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?
मुंबई | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. ही प्रकरणं पोलीस तसेच गृहखात्याला व्यवस्थित हाताळता आली नाहीत, परिणामी विरोधकांनी सरकारला चांगलंच खिंडीत पकडलेलं पहायला मिळालं. आता यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत.
गृहखात्याला विरोधकांकडून सातत्यानं लक्ष्य केलं जात असताना तिथं आता खमक्या नेत्याची गरज असल्याचं दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तसेच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्यानं गृहमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात असल्याचं चित्र विरोधकांकडून दाखवलं जात आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचं बोललं जात आहे.
अनिल देशमुख यांच्याऐवजी एखाद्या खमक्या नेत्याकडे हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. या प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या नावांचा विचार सुरु असल्याची माहिती आहे. अर्थात अंतिम निर्णय स्वतः शरद पवारच घेणार आहेत, त्यामुळे ते कोणत्या नावाला पसंती देतात यावर साऱ्या घडामोडी अवलंबून आहेत.
दरम्यान, दुसरीकडे गृहमंत्री बदलाची चर्चा असली तरी दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवण्याची देखील चर्चा सुरु आहे. मात्र त्याने विरोधकांना फारसा फरक पडणार नाही, गृहमंत्री अनिल देशमुख सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत, त्यामुळे ते पदावर राहिले तर आगामी काळात पुन्हा गृहखात्यातील नवे मुद्दे काढून त्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं.
थोडक्यात बातम्या-
प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता
महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?
मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन
रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!
गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक
Comments are closed.