बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री

मुंबई | महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. असा सज्जड इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, दीनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार होता कामा नये, असं गृहमंत्री म्हणाले.

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या घटना जर राज्यात घडल्या तर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

महत्वाच्या बातम्या-

“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!”

20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय?, सामनातून आज पुन्हा एकदा मोदींवर टीकेची झोड

…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More