नागपूर महाराष्ट्र

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

नागपूर |  महाराष्ट्रात कोरोनाचे हजारो रूग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाकडून वारंवार खबरदारीचं आवाहन करण्यात येत आहेत. लोकांमध्ये जागरूकता आणण्याचं काम केलं जात आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: एका आजीबाईंना मास्क घालून जनजागृती केली.

काटोल मतदारसंघात कोरोनाच्या उपाययोजनांसंदर्भातला आढावा घेण्यासाठी अनिल देशमुख काटोलच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्वतच्या हाताने एका आजीबाईंना मास्क घातला. आजच्या काळात मास्कचं महत्त्व किती आहे हे त्यांनी त्या आजीबाईंना समजावून सांगितलं.

गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरोनाच्या उपाययोजनांची माहिती घेत आहेत. तसंच प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना करत आहेत.

नागपुरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते विविध भागांना भेटी देऊन पोलिस अधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनसंबंधी माहिती घेत आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या