बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पलटवार

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राज्य सरकारला करत असलेल्या मदतीबद्दल आकडेवारीसह माहिती सांगितली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात एकच आरोप प्रत्यारोप सुरु झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता या वादात उडी मारली असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी मजूरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याकरता केंद्राच्या 300 कोटी रुपयांच्या योगदानाबद्दल केलेलं विधान धादांत दिशाभूल करणारं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातून स्वगृही परतलेल्या प्रत्येक मजुराच्या तिकीटाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच करण्यात आला आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे, तसेच शिवसेनेने देखील आता याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची आकडेवारीसह चिरफाड करण्याची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी… पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला कोरोनामुक्त बाळाला जन्म!

शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला; अभिनंदनसंदर्भात केलं हे वादग्रस्त वक्तव्य

पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More