बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ही नावं त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात; पालघरमधल्या 101 आरोपींची गृहमंत्र्यांकडून नावे जाहीर

मुंबई |  पालघर प्रकरणावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. आज सकाळी 9. 30 वाजता गृहमंत्र्यांनी याच विषयावर विरोधकांचे कान टोचत आता पालघर प्रकरणातील अटकेत असलेल्या 101 आरोपींची नावे जाहीर केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

ही नावं त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होती, असं म्हणत अनिल देशमुख यांनी 101 आरोपींच्या तीन याद्या ट्विट केल्या आहेत. यामध्ये एकही आरोपी हा मुस्लिम नसल्याचा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी तसं सकाळी बोलूनही दाखवलं.

काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या 101 जणांपैकी एकही मुस्लिम नाहीये. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांचे कान टोचले.

दरम्यान, सध्या संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत आहे. मात्र ही लढाई लढत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पालघरची घटना घडल्यानंतर 8 तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More