बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या आत्महत्येनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं पाऊल

मुंबई |  अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता बरीच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या आत्महत्येवरून बरेच प्रश्न उपस्थित होत आहे. यावरच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वाचं पाऊलं उचललं आहे.

सुशांतने रविवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आपलं आयुष्य संवपलं. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून फाशी घेतल्याने तसंच श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसंच बॉलिवूडमधील प्रतिस्पर्ध्यांच्या मुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये होता, अशीही माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकारावर अनिल देशमुख यांनी ट्विट करत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

सुशांतने का आत्महत्या केली? त्याच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण असावं? यासंबंधी सगळी चौकशी मुंबई पोलिस करतील. तसंच या तपासात सुशांतचे आत्महत्येसंबंधीचे सगळे धागेदोरे तपासले जातील, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. सुशांतच्या आत्महत्येचा तसाप केंद्रिय संस्थेकडे द्यावा, अशी मागणी सुशांतच्या नातेवाईकांनी केली आहे. सुशांतने आत्महत्या केलीये यावर आमचा विश्वास नाहीये. त्याच्या आत्महत्येबाबत सविस्तर आणि सखोल चौकशी करण्यात यावी, असं सुशांतच्या नातेवाईकांनी केली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार

महत्वाच्या बातम्या-

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

चॅटचा ‘तो’ स्क्रीनशॉर्ट शेअर करत अर्जुन कपूरने सुशांतला वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More