Top News महाराष्ट्र मुंबई

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच रामदासा…’; आठवलेंना गृहमंत्र्यांकडून ‘आठवले पॅर्टन’ सदिच्छा

मुंबई | आरपीयआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना आला तेव्हा गो कोरोना गो चा नारा देणाऱ्या आठवलेंना कोरोनाने गाठलं. अशातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना त्यांच्या स्टाईलमध्ये काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत.

‘कोरोना-गो’ चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का, असं म्हणत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

रामदास आठवले आपल्या कवितेतून भाष्य करण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. लोकसभेत बोलताना त्यांनी आपल्या कवितेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हसू आवरू दिलं नव्हतं.

दरम्यान, अनिल देशमुख यांचा आठवलेंची खिल्ली उडवण्याचा कोणताही हेतू नसून त्यांची कळकळ यातून दिसून आली.

 

महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे

‘भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

‘हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

‘दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला’; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या