बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर परमबीर सिंह भारताबाहेर गेले असतील तर’..; गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

मुंबई |  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी जमा करण्यास सांगितलं असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं. या प्रकरणाबाबत एनआयएनं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहेत. परंतु परमबीर सिंह चौकशीसाठी आलेच नाहीत त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला आहे की ते नेमके कुठे आहेत. अशातच आता याबाबतीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकलं की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही परमबीर सिंह यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली आहे. आणि जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती चांगली बाब नाही”, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारने ज्या वेळी परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होतं. तेव्हा ते मुंबई सोडून चंडीगडमध्ये राहायला गेले होते. त्यावळी वैद्यकीय कारण दिलं होतं. परमबीर सिंह सध्या रशियात असल्याच्या जोरदार चर्च्या सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आमचे कायदामंत्री सुपर डान्सर! नरेंद्र मोदींनी किरेन रिजिजूंचं केलं कौतुक!

टी-20 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघातील ‘या’ 3 खेळाडूंचं स्थान आहे धोक्यात!

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

“पुणे महापालिकेकडं दीड रूपयाची लसीकरणासाठी सुई नसणं, हेच सत्ताधारी भाजपचं अपयश”

रिया चक्रवर्ती ठरणार बिग बॉसमधील सर्वात महागडी स्पर्धक??; तब्बल ‘इतक्या’ लाखांची ऑफर!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More